तेर/ प्रतिनिधी-
 आईला पैसे मागितले म्हणून दिले नाहीत  म्हणून मुलाने आईच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले या घटनेत ही महिला.मयत  झाल्याने मुलाविरुद्ध ढोकी पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सुवर्णा रामहरी पसारे हिला मुलगा रोहित पसारे याने पैसे मागितले .आईने पैसे दिले नाहीत म्हणून मनात राग धरून त्याच्याकडे असलेल्या बाटलीतील पेट्रोल आईच्या अंगावर टाकून अंगावरील कपड्यास काडेपेटीने 15 एप्रिल 2020 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान अंगणामध्ये पेटवून दिले. सुवर्णा पसारे हि भाजल्याने तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील सुविधा हॉस्पिटल येथे दाखल केल्यावर उपचारादरम्यान 16 एप्रिल 2020 रोजी अडीच वाजता मयत झाली.
 या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून मुलगा रोहित रामहरी पसारे याच्याविरुद्ध ढोकी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 107/ 2020 कलम 302 भादवि प्रमाणे नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
 
Top