उस्मानाबाद/प्रतिनिधी
 उस्मानाबाद शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये डॉ. वेदप्रकाश पाटील सोशल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहर व तालूक्यात अन्नधान्य व किराणा सामानाच्या वाटपास सुरुवात झाली आहे.यापूर्वीही ही डॉ.वेद प्रकाश पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने पाचशे लोकांना  किराणा साहित्याचे वाटप केले होते.
उस्मानाबाद शहरासह आळणी, शिंगोली त्याचबरोबर विविध तांड्यावर या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. उस्मानाबाद शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली चौक,काळा मारुती,मारवाडी गल्ली,झाडे गल्ली, कोट गल्ली, रायभान गल्ली,गवळी गल्ली, उंबरे गल्ली येथे नगरसेवक प्रदीप मुंडे यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वस्तू त्यामध्ये तेल,साखर,शेंगदाणे,रवा,पोहे,तांदूळ, तिखट अशा अनेक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तर कोट गल्ली,देवी मंदिर येथे प्रसाद मुंडे यांच्या यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना वरील किराणामालाचे वाटप करण्यात आले.
 
Top