वाशी/प्रतिनिधी- 
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कडून तीन मे पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून लॉक डाऊन सुरू असल्यामुळे अनेक नागरिकाकडे पोटभर खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य नाही.त्यामुळे माजी जलसंधारण मंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजीराव सावंत यांनी भूम-परंडा-वाशी या तीनही तालुक्यामध्ये अन्नधान्याच्या पंचवीस हजार किट प्रशासनाच्या ताब्यात दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने   वाशी तालुक्यामध्ये वाशीचे तहसीलदार संदिप राजपुरे,यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर यांच्या मार्फत एक हजार किट सुपुर्त करण्यात आल्या. यामध्ये गहू साखर तांदूळ तेल आदी जीवनावश्यक वस्तू आहेत.
या अगोदरही आमदार तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी मतदारसंघांमध्ये स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेअंतर्गत नदी रुंदीकरण खोलीकरनाचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे.त्याचबरोबर गेल्यावर्षी दुष्काळामध्ये भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोफत पाणी वाटपाचे टँकर सुरू करण्यात आले होते.बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला बचत गटाला अर्थसहाय्य करण्यात आले होते. त्याचबरोबर मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलत त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये मोफत शिक्षणाची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे.डॉक्टर तसेच पोलीस यंत्रणा त्याचबरोबर लॉक डाऊन काळामध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक लाख मास्क व साबणाचे वाटप नुकतेच करण्यात आले होते. बंदीच्या काळामध्ये गरजू नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तूची व्यवस्था केल्याने ऐन संकटाच्या काळात आमदार तानाजी सावंत यांचे दातृत्व पुन्हा समोर आले आहे.
 
Top