कळंब /प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून नागरीकांना   दि. १० एप्रिल रोजी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सूरु असलेले स्वत धान्य दुकानांतून नागरिकांना मोफत ५ किलो तांदूळ देण्यात आले.
कोरोणा व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला असल्याने त्याची झळ सर्वच राज्यांत पोहंचली आहे. त्यामुळे राज्यभर लाँक डाऊन परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघता येत नसल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शासनाच्या वतीने प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत ५ किलो तांदूळ देण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे आज खामसवाडी येथे सदरील योजनेतुन धान्य वाटप सुरू केले आहे. सकाळी ८वाजता याचे उद्घाटन सोसायटी चेअरमनसंजय पाटील व गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील वाटप अन्न सुरक्षा व अंत्योदय कार्डधारकांना वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे नागरीकांना थोडाफार दिलासा लाभला आहे,तर ईतरही शासनाच्या मोफतच्या योजना आहेत त्यासुद्धा तात्काळ उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
  परराज्यातील नागरिकांना मोफत तांदुळ उपलब्ध होणार- चौरे
 “परराज्यातील एकुण १४ नागरीक खामसवाडी या गावात वास्तव्यास आहेत,त्यांना येथील रेशन कार्ड नाही तरी त्यांची सुद्धा नावे तहसिल कार्यालयास कळवली असून त्यांनाही मोफत तांदुळ उपलब्ध होणार असल्याचे रेशन दुकानदार बालाजी चौरे यांनी सांगितले”
 
Top