उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे द्वितीय चिरंजीव डॉ. शरदचंद्र गोविंदराव साळुंखे (वय ७०) यांचे निधन झाले.
   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे ते बंधू होत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडण घडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. वैदयकीय पेशात असूनही त्यांनी संस्थेच्या विकासाठी बहुमोल सहकार्य केले.शिक्षणमहर्षी डॉ.बापुजी साळुंखे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता.बापूजींच्या विचारांचा जागर करण्यासाठी ते राज्यभर फिरत असत. त्यांच्या निधनाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था परिवारात पोकळी निर्माण झाली आहे.
    त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्रीराम साळुंखे, मुलगी,भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.  रक्षाविसर्जन रविवारी (दि.१२) सकाळी सात वाजता आहे, तथापि कोरोनाच्या संकटामुळे कृपया येण्याचे शक्यतो टाळावे, असे संस्थेच्या वतीने आवाहन केले आहे.
 
Top