लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील आष्टा का येथील स्वस्त धान्य दुकान क्रं. 2 व 3 येथे अतिरिक्त दराने धान्य विक्रि करण्यात येत असल्याची राशन कार्ड धारकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
गोरगरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, हा मुळ हेतु डोळ्यासमोर ठेवुन राज्यभरात स्वस्त धान्य दुकानाचे जाळे विणण्यात आले असले तरी या योजनेचा फायदा गरजु व गरीबांना घेण्याऐवजी आष्टा का येथील दुकान मालक जास्त भावाने विक्रि करत असल्याचे व पावती देत नसल्याच्या तसेच याबाबत दिलेल्या तक्रारी मध्ये तालुक्यातील आष्टा का येथील दुकानदार दुकान क्रं. 2 व 3 चे मालक मल्लीनाथ सोलापुरे हे रेशन कार्ड धारकांना वाढीव दराने धान्य देत आहेत. पावतीही देत नाहीत. याबाबत नागरीकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली परंतु कोणतेही कार्यवाही झाली नसल्याचे दिसुन आले होते. असे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले होते.
ग्रामदक्षता समितीचे तथा सरपंच सुनिल सुलतानपुरे व सदस्य तथा तलाठी विनायक आवारी यांच्या समितीच्या सदस्यांनी दि.4/4/2020 रोजी प्रत्यक्ष धान्य दुकानात जावुन पंचनामा केला होता. त्यामध्ये दुकान क्रं. 2 व 3 चे लायसन्स निलंबीत करण्याची शिफारस करण्यात आली होती. अशा प्रकारच्या दुकानदारांकडुन तक्रारी येत असतील तर तहसीलदार विजय अवधाने यांनी पुरवठा नियंत्रण कक्ष तहसीलल कार्यालय लोहारा येथे यु.वी.मुदीराज अव्वल कारकुन मो.क्रं.7588428460 या क्रंमाकावर संपर्क करण्याचे आवाहान केले आहे.

 
Top