लोहारा/प्रतिनिधी
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा येथील रास्तभाव दुकानास भेट देऊन केंद्र व राज्य शासनाद्वारे बी.पी.एल च्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धान्य पुरवठयाबाबत आढावा घेतला.
 यावेळी सदर दुकानाअंतर्गत येणारे प्रेमला स्वामी,सुजित माशाळकर, संगीता  स्वामी,संजय लांडगे,भगवान बिराजदार असे काही इतर लाभार्थी त्यांना मिळत असलेल्या धान्यातले निम्मे धान्य इतर गरजू विशेषतः कार्ड धारक नसलेल्या लोकांना देत असल्याची माहिती मिळाली हा स्तुत्त्य उपक्रम पाहून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी समाधान व्यक्त केले व तेथे उपस्थित असलेल्या प्रेमला स्वामी व रास्तभाव दुकानदार युनूस पटेल यांचा सत्कार केला. हाच आदर्श तालुक्यातील इतर लोकांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार विजय अवधाने, नायब तहसीलदार शिराळकर, यांच्यासह लोहारा नगर पंचयातचे गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक शाम नारायणकर, लोहारा युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, सतीश लांडगे  आदी उपस्थित होते.
 
Top