लोहारा/प्रतिनिधी
लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमीटेड कारखाना लोहारा खु यांच्यावतीने सामाजिक भावना जपत शासकीय कार्यालयात व ग्रामपंचायत कार्यालयात दि.3 एफ्रिल 2020 रोजी हँड सॅनिटाईजरचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमीटेड कारखाना यांच्यावतीने तहसील कार्यालय लोहारा, पोलीस स्टेशन लोहारा, पं.स.लोहारा, ग्रामिण रुग्णालय लोहारा, स्टेट बँक ऑफ इंडिया लोहारा, ग्रामपंचायत कार्यालय खेड, ग्रामपंचायत लोहारा (खु) याठीकाणी हँड सॅनिटाईजरचे वाटप करण्यात आले.

 
Top