कळंब /प्रतिनिधी
शासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत  काम करणाऱ्या डाँक्टर,नर्स  ,पोलीस,आशा कार्यकर्ती ,अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामसेवक यांना ज्या प्रमाणे ५० व २५ लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले आहे त्या प्रमाणेच कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी काम करत असलेल्या शिक्षकांनाही विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी निवेदना द्वारे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.
राज्य ,देश व संपुर्ण जगातच कोरोनो विषाणू ने थैमाण घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णावर उपचार करण्यासाठी अनेक डाँक्टर ,नर्स  ,पोलीस आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी कार्यकर्ती ,आशा कार्यकर्ती ,शिक्षक, व  ग्रामसेवक आपला जीव धोक्यात घालुन  गावपातळीवर  आपले योगदान देत आहेत .अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी  शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षकांच्या सेवाही वर्ग केलेल्या असुन  गावपातळीवर कोरोना सहाय्यता कक्ष स्थापन करुन या कक्षात ग्रामसेवक ,तलाठी यांच्यासह शिक्षकांना ही नेमणूका देऊन  या कक्षात बाहेर देशातुन तसेच देशातील व राज्यातील इतर जिल्ह्यातुन आलेल्या  नागरीकांची नोंदणी करुन  त्यांची माहीती तालुकास्तरावर देण्याची जबाबदारी सोपवली आहे तसेच इतर जिल्ह्यातुन आलेले जे नागरीक आलेले आहेत  व जे क्वारंटाईन आहेत त्यांच्यावर देखरेख ठेवणे तसेच त्यांना कांही बाबी समजावून सांगणे ही जबाबदारीही शिक्षकांकडे दिली आहे तसेच कांही जिल्ह्यात पोलीस मित्र म्हणुन नेमणूक देऊन वाहनाची नोंदणी व तपासणीचे कामही दिलेले आहे  राज्यासह देशावर मोठे संकट आल्या मुळे हे काम   करणे पण गरजेच आहेत तसेच इतर कर्माचा-यांना ज्या सुविधा शासनाने दिलेल्या आहेत त्या सुविधाही शिक्षकांना देणे गरजेचे असताना तशा कोणत्याही सुविधा शिक्षकांना मिळालेल्या नाहीत .
तरी इतर कर्माचा-यां प्रमाणे शिक्षकांनाही विमा संरक्षण तसेच इतर सर्व सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे व    जिल्हाधिकारी   यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले भक्तराज दिवाने , अशोक जाधव ,एल.बी.पडवळ ,जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे सरचिटणीस विठ्ठल माने ,श्रीनिवास गलांडे ,व्यंकट पोतदार ,सुधीर वाघमारे .महीला आघाडीच्या श्रीमती रोहीणी माने, श्रीमती जेमिणी भिंगारे, श्रीमती अरुणा वाघे  व श्रीमती सुमित्रा पांढरे यांनी केली आहे.
 
Top