तुळजापूर/प्रतिनिधी -
लॉकडाऊनमध्ये माणुसकीची भावना जपत मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भुकेल्यांनसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.  या उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड भागातील सांगवी येथे  महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जेवण देऊन  करण्यात आला. त्यांनतर वायसीएम हॉस्पिटलमधील नर्स व आरोग्य सेवकांना, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलिसांना, सांगवीतील मजूर अड्डा येथील कामगार, महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, पिंपळे गुरव, नखाते वस्ती, रहाटणी, दिघीमधील आरोग्य कर्मचारी यांना जेवणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले,  आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, वामन भरगंडे, शिवाजी सुतार, सतिश सावंत आदी उपस्थित होते.
 याबाबत बोलताना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मराठवाडातील मंडळी मोठ्या संखेने आहेत ही मंडळी तेथेच थांबावेत इकडे येवु नये म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने दररोज दोनशेहून अधिक गरजूंना ज्वारीची भाकरी, शेंगदाणा चटणी, खोबऱ्याची चटणी असे जेवण देण्यात येईल. यामध्ये विद्यार्थी, पोलीस, महापालिका कर्मचारी, आरोग्यसेवकांचा समावेश आहे. याबरोबरच मास्कचेही मोफत वाटप केले जात आहे. ही सेवा आम्ही 14 एप्रिलपर्यंत मोफत चालू ठेवणार आहोत.डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार यांना त्यांच्या मागणीनुसार कामाच्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन जेवण देतील, असेही अरुण पवार यांनी सांगितले.

 
Top