उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 एबीपी माझाचे विशेष प्रतिनिधी पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावरील गुन्हा  मागे घेऊन त्यांना तत्काळ मुक्त करण्याची मागणी केली आहे. उस्मानाबाद येथे आज ( दि. १६)पत्रकारांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेऊन राज्यपाल व  मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन दिले. पत्रकार कुलकर्णी यांच्यावरील चुकीचा गुन्हा व अटक याचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला.   
  उस्मानाबाद येथे आज   जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी  एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत ,त्यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. श्री कुलकर्णी यांच्यावर  दाखल केलेला गुन्हा आणि  अटक ही वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणारी  असून वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात आणणारी आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करावी अशीही मागणी  जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव ,चंद्रसेन देशमुख, राजाभाऊ वैद्य, देविदास पाठक, रवींद्र केसकर,  महेश पोद्दार ,चेतन धनुरे, प्रवीण पवार, आझर शेख, दिलीप पाठक नारीकर ,श्रीराम क्षीरसागर ,काकासाहेब कांबळे , विनोद बाकले , संतोष शेटे  आदींच्या निवेदनात स्वाक्षरी आहेत.
 
Top