परंडा / प्रतिनिधी
चेन्नई येथून आल्याने डॉक्टरांनी होम क्वारंटाईन केले असताना देखील सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे आढळुन आल्याने परंडा तालूक्यातील सरणवाडी  येथील ड्रायव्हर नलवडे यांच्या विरुध्द दि.१५ एप्रील रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
   या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की परंडा तालुक्यातील सरणवाडी येथिल नलवडे हा तरूण दि.१२ एप्रील रोजी चेन्नई येथुन ट्रक घेऊन सणवाडी गावी रात्री १२ वाजेच्या सुमारास आला होता.दि.१३ रोजी कोरोना संसंर्ग प्रसार विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच सदरील युवकास आसु येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात तपासणी साठी पाठविन्यात आले होते.डॉक्टरांने नलवडे यास होम क्वारंटाईन मध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.मात्र नलवडे हा.दि.१५ रोजी गावातील  मारूती मंदीर परीससरात तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे पथकास आढळुन आल्याने त्याच्या विरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top