लोहारा/प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात अडकलेल्या गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे कृषी उत्पन्न बाजार समिती,मुरूम यांच्या कडून २०१ कीट दि १६ एप्रिल रोजी उमरगा येथील तहसीलचे उमाकांत देशपांडे, मुरूम नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत केरूरकर यांच्याकडे मार्केट कमिटीचे सभापती बापूराव पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.
यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, कंटेकूरचे सरपंच गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष धनंराज मंगरुळे, सहसचिव आण्णाराव कुंभार आदींच्या उपस्थितीत कीट देण्यात आले. माणूसच माणसाच्या मदतीला धावून येवू शकतो. माणूसकी हाच आपला एकमेव धर्म आहे. अशी भावना व्यक्त करत प्रशासनाकडून या कीटचे वाटप योग्य व गरजूंना होईल. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पुढे काय होणार, याची कोणालाही कल्पना नाही. तरीसुद्धा सरकार, प्रशासन आपल्या पातळीवर वेगवेगळी पावले उचलताना दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रूग्णालय उभारण्याची तयारीही केली जात आहे. तरी पण रुग्णांची संख्या वाढली तर कुठे सोय करायचे,हा सध्या मोठा प्रश्न असल्याने किमान आपण जीवनावश्यक वस्तूच्या रुपाने कीटची मदत व्हावी.हे कीट तयार करण्यासाठी शिवराज पाटील, सुर्यकांत जाधव, अकरम खान, चंद्रकांत आमरे,सुग्रीव पाटील, संजय सुरवसे, सुरेश जाधव आदींनी पुढाकार घेतला.

 
Top