उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्हा बंदी असतानाही छुप्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. छुप्या मार्गाने गावात येणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस विभागाने पोलिस पाटलांना दिल्या आहेत. त्यामुळे ४ ठिकाणी असे प्रकार आढळून आल्याने पोलिस पाटलांच्या तक्रारीवरून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महेबूब नालसाहेब मातोळे (रा. जकेकुर, ता. उमरगा) हा १५ एप्रिल रोजी बाहेर जिल्ह्यातून जकेकूर येथे आला. तर कल्पना गुरुनाथ बनशेट्टे (रा. हागलुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) या १६ एप्रिल रोजी हागलुर येथून कोळसूर (ता. उमरगा) येथे आल्या. प्रशांत मल्लिकार्जुन लिंबाळे, माय लिंबाळे (दोघे रा. एकुरगा) हे १८ एप्रिल रोजी पुणे येथून एकुरगा येथे आले.

 
Top