वाशी /प्रतिनिधी- फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात  आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत अजिंक्य प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेने यशाची उत्तुंग भरारी मारली आहे.  इयत्ता पहिली मध्ये 150  पैकी 140 गुण घेऊन अजिंक्य मुकुंद मेदने  राज्यात सहावा व जिल्ह्यात दुसरा.  इयत्ता दुसरी मध्ये 150 पैकी 140 गुण घेऊन कु. बादेला नजीका हाशम  राज्यात पाचवी तर जिल्ह्यात चौथी,  आणि इयत्ता चौथी मध्ये 300  पैकी 288 गुण घेऊन पितळे सार्थक शरद याने राज्यात  सातवा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादित केले आहे. याशिवाय इयत्ता पहिली मधूनच अनिमेश नाईकवाडी केंद्रात प्रथम राधिका हजारे,  चिन्मय जाधव, आर्यन जाधवर केंद्रात  द्वितीय. अथर्व मोळवणे केंद्रात पाचवा. इयत्ता दुसरी मधून राजवीर कवडे केंद्रात प्रथम, वरद घोलप सहावा, भक्ती ढेपे  सातवी. इयत्ता तिसरी मधून दिग्विजय कवडे केंद्रात दुसरा, अकबर मणियार केंद्रात पाचवा अथर्व ढेंगळे केंद्रात  सहावा आला इयत्ता चौथी मधून भक्ती रवींद्र जोंधळे दुसरी आणि इयत्ता सहावी मधून अथर्व उमेश  चेडे व मयूर मुकुंद मेदने या दोघांनी केंद्रात चौथा क्रमांक मिळवला.
वरील सर्व विद्यार्थ्यांना  सांडसे  मॅडम,  कोरडे मॅडम   भोसले, गाडे,  क्षीरसागर, व इतरांचे मार्गदर्शन मिळाले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे  व त्यांना मार्गदर्शन  करणाऱ्या शिक्षकांचे  श्री दादासाहेब चेडे, श्रीमती  आश्लेशा कवडे इ.  पालकांनी तसेच संस्थापक श्री. एस. एल. पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

 
Top