तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन शेतकरी वर्गाचा मुळावर उटल असुन तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील ऐका शेतकऱ्याचा शेतातील  आठ ऐकरतील टमाटे विकता येत नसल्याने ते जागेवरच सडत असुन यामुळे शेतकऱ्याचे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.
आठ ऐकरातील सडत चाललेले टमाटे झाडे  काढुन टाकण्यासाठी उपटण्यासाठी व पुन्हा  नव्याने  रान तयार करण्यासाठी पुन्हा  चाळीस ते पन्नास हजार खर्च येत आता करावे काय असा प्रश्न त्यास पडला आहे. या टमट्याने  शेतकऱ्याचे चांगले च अर्थिक कंबरडे मोडले आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन लागु केली यामुळे  दळणवळण बंद झाले त्यातच शहरातील आडत मार्केट बंद असल्याने याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतमाल विकण्यावर झाला आहे.
  यात विशेषतः शेतकऱ्याचा हाताशी आलेला भाजीपाला विकता येत नसल्याने टमटे  डोळ्या देखत वावरात  नासत आहे . अशीच पारिस्थिती तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील टमाटे पिकवणा-या राजाभाऊ  रोचकरी याचावर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तुळ येथील राजाभाऊ  रोचकरी यांनी आपल्या आठ ऐकर क्षेत्रात टमाटे लावले त्यांनी सतत दुष्काळाशी लढत लढत योग्य नियोजन करुन टमाटे शेती  जोपासली आहे .या टमाटे शेतीसाठी सुमारे बारा लाख खर्च आला आता यातील टमाटे विक्री स सोलापूर ला घेवुन जाण्यास आरंभ होताच  कोरोना आला आणि आडत मार्कट बंद झाले  त्यातच वाहने बंद यामुळे टमटे गेली ऐक महिन्या पासुन जागेवरच सडून  जात आहेत.
यातील एका झाडाला 130किलो टमाटे लागतात याला किलोला 3ते4रुपये भाव मिळाला तरी चाळीस ते पंचेचाळीस लाख उत्पन्न मिळते. पण टमट्याला मार्कट नसल्याने या उत्पन्नवर पाणी पडले आहे. सध्या या आठ ऐकृरात सडक्या  टमट्याचा सडा पडला असुन ही घाण काढुन पुन्हा रान तयार करण्यासाठी तीस ते चाळीस हजार खर्च येणार असल्याने आता करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असुन सध्या हा शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.दुष्काळ अतिवृष्टी अदि संकटात कसबसे टमाटे शेती वाचवली तर कोरोना संकटाने टमाटे शेतीची वाट लावली असुन आता जगावे कसे असा प्रश्न पडला असुन आमच्या या पिकाचे पंचनामे करुन मदत दिल्याशिवाय आम्हाला नव्यानै शेती करणे शक्य होणार नसल्याची प्रतिक्रिया राजाभाऊ रोचकरी या शेतकऱ्याने दिली,
 
Top