उमरगा / प्रतिनिधी-
  देशात कोरोना विषाणूची साथ पसरल्यामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने किराणा सामानाच्या भावात अवघ्या पंधरा दिवसांत मोठी दरवाढ झाली आहे. मूग, हरभरा यासह इतर डाळींचे भाव किलामागे वीस रुपयांनी वाढले आहेत खाद्यतेलाच्या भावात ही वाढ झाली आहे.
शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडे किराणा मालाचा असलेला साठा आणखी काही दिवस राहणार आहे. त्यामुळे बहुतेक किराणा मालाचे भाव वाढत असून  मैदा, रवा, किराणा मालात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे अनेक ठिकाणी तर किराणा उपलब्ध नाही. दरातही गेल्या आठडाभरात वाढ झाल्याने बाजारात सद्यस्थितीत डाळी तेजीत आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात ग्राहकांकडून मॅगी, बिस्किटे, चायनीज, फरसाण वस्तूंचीही मागणी होत आहे. अशा प्रकारच्या ‘रेडी टू कूक’पदार्थांचा पुरवठा कमी असल्याने अशा वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे शहरात अनेक भागात बिस्किट चढ्या दराने विक्री होत आहे. ग्राहकांची अचानक गर्दी होत असल्याने मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडले,काही किराणा दुकानात सुद्धा सामानाच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. जीवनाश्यक वस्तूंची वाढ झाल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. संचारबंदी मध्ये खाद्यतेलाच्या भावात लिटरमागे वीस रुपयांपर्यंत दर वाढ झाली आहे. लॉकडाउनमध्ये विविध प्रकार च्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असल्याने बंदच्या काळात घरातच बसून असलेल्या नागरिक, गृहिणीना मासिक किराणामालाच्या खरेदीवर चढ्या दराने वस्तू खरेदी करावी लागत असल्याने अधिक खर्च करावा लागतो आहे.
 
Top