उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांची लॉकडाऊन, संचारबंदीमुळे उपासमार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्याची मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली होती. याची तातडीने दखल घेण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्याचे आदेश गुरूवारी (दि.२३) जारी केले आहेत.
कोरोना, लॉकडाऊन आणि संचारबंदीचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा वृत्तपत्र विक्रेत्यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.१८) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याची तातडीने दखल घेण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी गुरूवारी वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
 
Top