उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिकच्या विद्यमाने तलवारबाजी या ऑलिम्पिक खेळाचा प्रसार, प्रचारासाठी ऑनलाइन राज्यस्तरीय तलवारबाजी कार्यशाळा घेण्यात येत आहे.
ही कार्यशाळा दि.२६ एप्रिल ते ३ मे २०२० पर्यंत चालणार असून यामध्ये तज्ञ मार्गदर्शकांमार्फत तलवारबाजीची मूलभूत माहिती, परिचय करून दिला जाणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार असून कार्यशाळेसाठी १०० रुपये प्रवेश फीस ठेवण्यात आली आहे. यातून जमा होणारी संपूर्ण रक्कम कोरोना विरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा ही गूगल क्लासरूम या ॲपवर होणार आहे. कार्यशाळेसाठी क्रीडाशिक्षक, जिल्हा संघटक, प्रशिक्षक, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू , पालक आदींनी सहभागी होण्याचे आवाहन आवाहन नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक दूधारे व सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय सचिव प्रमोद डोंगरे (७९७२५५६६३९) व श्रीधर सोमवंशी (९४०३०४९००७) यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा संघटनेचे सचिव राजकुमार सोमवंशी यांनी कळविले आहे.

 
Top