उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा या २ तालुक्यात ३ कोरोणा बाधित रुग्ण ३ एप्रिल रोजी सापडले होते. ३ रुग्ण कोरोणा बाधित सापडल्या नंतर उस्मानाबाद जिल्हा हादरुन गेला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन सहीत आरोग्य यंत्रणा अंग झटकून कामाला लागली, कोरोना बाधित रूग्णांसह पुण्या,मुंबईवरून आलेल्या ६६ हजार लोकांची तर परदेशातून आलेल्या ९५ लोकांची तपासणी केली. आज घडीला या सगळ्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ३ पॉझीटीव्ह असलेल्या रूग्णांचा फायनल रिपोर्ट रविवार दुपारपर्यंत येणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त होऊन ग्रीन झोन मध्ये येईल, अशी अपेक्षा सिव्हील सर्जन डाॅ. राजाभाऊ गलांडे यांनी लोकराज्यशी बोलताना व्यक्त केली .
डाॅॅ. गलांडे यांनी माहिती देताना सांगितले की, दररोज थंडी, ताप, खोकल्याचे तीन ते चार रूग्ण तपासणीसाठी येत असतात. आजपर्यंत २१४ रूग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांचा  निगेटीव्ह  रिपोर्ट आलेला आहे. फक्त ३४ रूग्णांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. तर १४ रूग्णांचे रिपोर्ट रिजेक्ट केले आहेत.
  जिल्हा प्रशासन पोलीस आरोग्य विभाग नगर पालिका सामाजिक संस्था अंग झटकुन कामाला लागला. उमरगा व लोहारा हे २ तालुके २ मे पर्यंत सिल केले आणि शोध सुरु झाला या ३ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा जे सापडले त्यांना तुळजापुर व उमरगा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांचे स्वँब चे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले या पैकी एका हि व्यक्तीचा वैद्यकिय अहवाल पाँझेटिव्ह आला नाही सर्वाचा अहवाल निगेटिव्ह  आले आहेत, त्यामुळे  प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला
जिल्हयातील प्रत्येक गाव कोरोणा बाधित रुग्ण शोधण्यासाठी पिंजुन काढला जिल्हयातील प्रत्येक गावाने गाव बंदी स्विकारली गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासनी केली प्रत्येकाला मास्क व सँनिटायझर वाटप केले व १००% गाव लाँक डाऊन केले
लाँक डाऊनच्या काळात प्रशासनाने घरा बाहेर फिरणार्या व्यक्तिवर कारवाई कारवाई करायला सुरुवात केली अगोदर दंडात्मक कारवाई केली नंतर गुन्हे दाखल केले तर काहीना पोलिसानी प्रसाद दिला या मुळे नागरिक घरातच बसुन राहिले या मुळे कोरोणाची साखळी तुटली
काल उमरगा येथे १४ दिवस उपचार घेत असलेल्या ३ कोरोणा बाधित रुग्णांचा पहिला वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला व  पुन्हा या ३ रुग्णांची दुसरी वैद्यकिय चाचणी घेण्यात येणार आहे जर दुसरा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला तर उस्मानाबाद जिल्हा हा कोरोणा मुक्त होईल
 
Top