उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत डिजिटल मध्येमांचे उत्तम व्यवस्थापन चालू आहे. विभागा मार्फत सध्य परिस्थितित सामाजिक व विद्यार्थी हित लक्षात घेऊन विविध पुढाकार घेण्यात आले आहेत. विभागामार्फत “कोविड19 बाबत जनजागृती व स्वताचे व्यवस्थापन” कार्यक्रम ऑनलाइन चालू आहे. दोनच दिवसात याला एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक व ईतर लोकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. तसेच त्या सर्वांना विभागा मार्फत प्रमाणपत्र देखील सहभागीच्या ईमेल वरती पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्या साठि “केअर टेकर” नेमले आहेत जे विद्यार्थ्यंना ऑनलाइन संपर्कात असून रोज विविध अभ्यासक्रमा बाबत उपक्रम घेतले जात आहेत. मॅनेजमेंट गेम्स, पी पी टी तयार करणे, विविध स्पर्धा इत्यादि घेणे चालू आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट साठी कविता व इतर मोटीवेशनल व्हिडिओ व ऑडिओ पाठवले जातात.
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती  लिखाण करून ऑनलाइन जमा करण्याची स्पर्धा घेण्यात देखील घेण्यात आली होती यातदेखील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. विभागा मार्फत “अकडमिक (Academic) डिजिटल प्लॅटफॉर्म” द्वारे शिक्षणाचे “टिचिंग लर्निंग स्त्रोत” एका छताखाली येणार आहेत. विद्यार्थ्यांना कुठेही सदर सेवा घेता येऊ शकेल याचा प्रयत्न या मार्फत होणार आहे. सदर परिस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेऊन त्यांच्या तनाव मुक्ति साठी देखील विभागा मार्फत प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी सदर नियोजन केले असून यासाठी मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, मा प्र कुलगुरू प्रा. डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव प्रा. डॉ.  जयश्री सूर्यवंशी, आधीष्टाता प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. अभिजीत शेळके, उप-परिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दिक्षित यांचे मार्गदर्शना मिळत आहे. या ऑनलाइन जनजागृती कार्यक्रमास विभागाचे सर्वजन घरी राहून पूर्ण वेळ देत आहेत. या प्रकल्पाचे समन्वयक प्रा. सचिन बस्सैये, सह समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, सह समन्वयक प्रा. वरुण कळसे खूप मेहनत घेत आहेत. अक्षय शिंदे, आविष्कार तवले विद्यार्थी तांत्रिक मदत करत आहेत. विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील मेहनत घेत आहेत.
 
Top