तेर/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनिमीत्त कोरोना रोगामुळे भाविक-भक्ताविना महापूजा करण्यात आली.
दरवर्षी चैञ वद्य एकादशीपासून श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेस प्रारंभ होतो . तर दशमीलाच राज्याच्या कानाकोप-यातून  दिंडयाचे आगमन तेरमध्ये होत आसते.परंतु कोरोना रोगामुळे श्री.संत गोरोबा काका व शिवमंदीर ट्रस्टचे प्रशासक पी.बी.भोसले यानी शासनाच्या आदेशानुसार वार्षिक याञा रद्द केलेली आहे.त्यामुळे 18 एप्रिलला एकादशीमुळे मंदीरात महापूजा भाविक-भक्ताविना करण्यात आली.भाविक-भक्ताविना तेरमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

 
Top