तेर /प्रतिनिधी -
शासनाच्या आदेशानंतर दिवस रात्र सुरू असलेल्या हातभट्टीच्या आड्यावर ढोकी पोलिसांनी कारवाई करत हजारो लिटर दारु जाग्यावरच उध्दवस्त केल्याची घटना (तेर ता .उस्मानाबाद)  येथे मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली त्यामुळे अवैधरित्या हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या च्या चबूत खळबळ उडाली आहे.                                         
 जिल्हाभरात कोरोना व्हायरसचा प्रसार व संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील दारुची  दुकाने बंद करण्यात आली असतानाही तेर ता उस्मानाबाद येथे सर्रास राजरोसपणे हातभट्टी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दूरक्षञचे  बिट अंमलदार प्रकाश राठोड , नितीन कोतवाड ,  साखरे यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी तेर येथील हातभट्टीच्या आड्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास कारवाई करत हजारो लिटर दारू उध्वस्त केली .
 
Top