तेर/प्रतिनीधी
मुलानेच आईच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटऊन दिल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 15 एप्रिलला सकाळी घडली.
 पोलिस सुञाकडून मिळालेली माहीती अशी की,   उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सुवर्णा रामहरी पसारे हीला मुलगा रोहीत रामहरी पसारे याने  घरातच  15 एप्रिलला सकाळी  आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याने सुवर्णा पसारे या जवळपास 40 टक्के भाजल्या असून त्यांना तेरच्या ग्रामीण रूग्नालयात प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील सुविधा हाँस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तेर दुरक्षेञचे बिट अंम्मलदार प्रकाश राठोड जबाब घेण्यासाठी गेले असता जळीत महीलेला तोंडावर पोळले असल्याने ती जबाब देऊ शकली नाही.

 
Top