उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने बसविण्यात आली.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांच्या हस्ते या निर्जंतुकीकरण यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. या निर्जंतुकीकरणासाठी हायड्रोक्लोरोक्वीन एक टक्के या औषधाची फवारणी करणारी यंत्रणा जनकल्याण समितीने स्वखर्चातून उभारली आहे. याचा उपयोग रुग्णालयात प्रवेश करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. यावेळी जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू, कार्यवाह अॅड. श्रीकृष्ण मसलेकर, प्राचार्य एम. डी. पाटील, सतीश राजेनिंबाळकर, शंकर पांढरे आदी उपस्थित होते.
 
Top