उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर ‘सॅनिटायझर टनेल’ (खोली) उभारण्यात आले आहे. मुख्यालयात बाहेरुन आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस या खोलीतून पुढे जायचे आहे. खोलीत असणाऱ्या फवाऱ्याद्वारे त्या व्यक्तीच्या अंगावर औषध मिश्रीत पाणी फवारुन निर्जंतुक केले जाणार आहे. रविवार दि. 12 एप्रील 2020 रोजी  पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या हस्ते या टनेलचे (खोली) उद्घाटन केले आहे. या प्रसंगी स्था.गु.शा. चे पोनि श्री. दगुभाई शेख व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top