उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2) (इ) अन्वये  उस्मानाबाद जिल्हयातील बी-बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने,आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग,हातळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटेभाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊनचे कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाय योजना नियम 2020 प्रसध्दि केलेअसून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणूमुळे (covid-19) उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
कोरोना विषाणूमुळे (covid-19) उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी लॉकडाऊनचे आदेश पारित केले आहेत. बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत समावेश आहे आणि ज्याअर्थी बियाणे व खते या कृषि निविष्ठांचा वापर कृषी मालाच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक असल्याने बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना ,बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग,हाताळणी केंद्र,बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊनचे कालावधीत सुरु ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार  जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2) (इ) अन्वये तसेच उपरोक्त नमूद सूचनांचे अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील बी बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने,आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग,हातळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटेभाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व  त्यांच्या दुरुस्तीची दुकाने लॉकडाऊनचे कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यासाठी परवानगी देत आहे.
 लॉकडाऊनचे काळामध्ये वरील नमूद वेळेत बाहेर पडता यावे याकरिता तालुक्यातील बी बियाणे व खतांचे विक्रेते, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा ,कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने येथील कर्मचारी यांची यादी तालुका कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी(कृषी) पंचायत समिती यांनी संबंधित पोलीस स्टेशन व तहसिलदार तथा INCIDENT COMMANDER यांचे कार्यालयास सादर करावी, असे ही आदेशात नमूदआहे.
 
Top