उस्मानाबाद/प्रतिनिधीन-
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विचार व मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील तसेच भाजपा नेते, कोअर टीमचे सदस्य झूम अॅपद्वारा उपस्थित असतील.
राज्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेने मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता BJP Maharashtra अथवा Devendra Fadnavis या फेसबुक पेजवरून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अनोखी ई आदरांजली वाहण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.

 
Top