उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 सध्या कोरोना या विषाणुजन्य रोगाने संपुर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेने पुढाकार घेतला आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे संस्थेच्यावतीने घरोघरी जावून जनजागृती करण्यात आली.
संपुर्ण जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरही तसेच ग्रामीण भागातील ही व्यवहार पुर्णपणे ठप्प आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती व्हावी स्वंयशिक्षण प्रयोग संस्थेकडून विविध गावात जनजागृती करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे संस्थेच्या संवाद सहाय्यक सुवर्णा सोनवणे व आशा कार्यकर्ती अर्चना घोगरे यांनी गावात प्रत्येक घराला भेट देवून कोरोनाबाबत जनजागृती केली. यावेळी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले. याबरोबरच नागरिकांना हातधूण्याचे डेमो स्ट्रेशनही करून दाखवण्यात आले.
याबरोबरच संस्थेचे संवाद सहाय्यक सुवर्णा सोनवणे यांनी स्वतः कपड्याचे शिऊन बनवलेल्या मास्कचे गावातील नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कुटूंबाच्या घरोघरी जावून कोरोना रोगाबद्दल आपली आणि आपल्या परिवाराची काळजी कशी घ्यावी हेही सांगण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या प्रोग्राम डायरेक्टर मोमीन तब्बसुम व तालुका समन्वयक स्नेहा माने यांनी दिली आहे.

 
Top