पाडोळी / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील पुणे येथे पोट भरण्यासाठी गेलेल्या आणि लॉकडाऊन मुळे पुणेत अडकून पडलेल्या कुटुंबाना आमदार कैलास पाटील यांच्यामुळे २० दिवस पुरेल एवढे रेशन पुणे येथे पिंपरी चिंचवड भागात राहणाऱ्या १० कुटुंबाना देण्यात आले आहे.
मूळ टाकळी(बें) येथील भोमेश्वर नरवडे यांचे कुटुंब काही वर्षांपासून पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात राहत आहेत मात्र, लॉकडाऊन मुळे हाताला काम आणि पोटाला अन्न भेटत नसल्याने यांनी उस्मानाबाद कळंब चे आमदार कैलास पाटील यांना फोन केला, हकीकत सांगून, आम्हाला गावाकडे येण्याची व्यवस्था करा म्हणून आग्रह धरला, या परिसरात उस्मानाबाद जिल्ह्यातील १० कुटुंब अडकून पडले आहेत, सर्वांची अवस्था वाईट आहे, घरात होते तेवढे रेशन संपले आहे,लहान मुलासह आम्ही उपाशी राहत आहोत, बाहेर सर्व दुकाने बंद आहेत, खायला पेयला काही भेटत नाही ,त्यामुळे तुम्ही आमची व्यवस्था करा आणि आम्हाला उस्मानाबाद ला पोहच करायची व्यवस्था करा असा आग्रह केला. तेव्हा तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहावा मी तुमची रेशनची व्यवस्था करतो असा आमदार कैलास पाटील यांनी शब्द दिला आणि दुसऱ्याच दिवशी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोरे यांनी २० दिवस पुरेल एवढे रेशन उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, भूम, परंडा, तुळजापूर भागातील पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात राहणाऱ्या १० कुटुंबाना घर पोच केले. संकटकाळी आमदार कैलास पाटील हे धावून आल्यामुळे हे सर्व कुटुंबातील सदस्य आ.पाटील यांचे आभार मानत आहेत.

 
Top