भूम/ प्रतिनिधी -
शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या तेरा व्यक्तींवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने भूम पॅटर्न संकल्पना राबवून प्रत्येक वॉर्डातील गल्ली - बोळातील मार्ग बंद केले. गटनेते संजय गाढवे, एपीआय मंगेश साळवे, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस व स्वयंसेवक रात्रंदिवस जबाबदारी पार पाडत आहेत. मास्क वापरण्याबाबत आदेशानुसार दि.१७ रोजी आदेशान्वये दि. १७ रोजी शहरात १३ व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला.
 
Top