उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी  दि.3 मे 2020  पर्यंत वाढविण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी  दि.20 एप्रिल 2020 पासून सुरु आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना बाबत सविस्तरआदेश निर्गमित करण्यातआले आहेत. त्या आदेशातील मुद्या क्र.2 (2) मध्ये सर्व प्रकारची औषधी दुकाने, फार्मसी,जनऔषधी केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणाची दुकाने कायम कार्यान्वित राहतील,असे नमूद करण्यातआलेआहे.
 त्या मुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार यापूर्वी दिलेल्या आदेशात सुधारणा करुन उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवा (आयुष सेवेसह) आणि सर्व प्रकारची औषधी दुकाने, फार्मसी, जन औषधी केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणांची दुकाने चष्म्याच्या दुकानांसह कायम कार्यान्वित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51,महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यास ते पात्र राहतील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांका पासून तात्काळ करण्यात यावी.

 
Top