तेर / प्रतिनिधी
संतशिरोमणी गोरोबाकाकांचा १८ एप्रिल रोजी होणारा वार्षिक समाधी सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला अाहे. भाविकांनी दर्शनासाठी तेरमध्ये येऊ नये, असे आवाहन संत गोरोबाकाका व शिव मंदिर ट्रस्टचे प्रशासक प्र. ब.भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागू झाल्याने सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे गोरोबाकाका मंदिर समितीकडून यंदा १८ एप्रिल २०२० रोजी कोणताही सोहळा उत्सव यात्रा कार्यक्रम होणार नाहीत. परंतु, यंदा मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम वगळता इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे प्रशासक भोसले यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.

 
Top