उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 मोबाइलवर कॉल करून बँक खात्याची माहिती घेत खात्यावरील ५८ हजार, ३११ रुपये ऑनलाइन पध्दतीने काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब भास्कर कसबे (रा. उपळा ता. उस्मानाबाद) यांना मंगळवारी (दि.१५) सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाने मोबाइलवर कॉल करुन बजाज फायनान्सच्या मोटारसायकल कर्जाचे प्रलंबित हप्ते भरायचे आहेत. तुम्ही क्युएस ॲप डाउनलोड करुन अलाऊ या बटनावर क्लिक करा, असे सांगितले. तसेच त्यांना मोबाइलवर बोलते ठेऊन, पत्नीच्या बँक खात्याची माहिती घेउन पत्नीच्या बँक खात्यातील ५८ हजार ३११ रुपये ऑनलाइन पध्दतीने हस्तांतरित करुन फसवणूक केली. बाळासाहेब कसबे यांच्या फिर्यादीवरून संबंधीत अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
Top