उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली मराठवाडयातील एकमेव नागरी सहकारी बँक उस्मानाबाद जनता सहकारा बक लि., उस्मानाबाद या बँकेने नकतेच संपलेल्या २०१९-२० या अधिक वर्षात दिनांक ३१ मार्च २०२० अखेर रुपये २६०० कोटीचा बँकींग व्यवसाय टप्पा पुर्ण केला आहे.मागील आर्थिक वर्षाचे तुलनेत बॅकने चाल अर्थिक वर्षात २०० कोटीहून अधिक नवीन व्यवसाय करुन, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, कमी होणारी गुंतवणुक व महाराष्ट्रमराठवाडयात पाण्याची दुर्भिक्ष परिस्थिती/कोरडा दुष्काळ असतांना देखील उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. ब्रिजलालजी.मोदाणी यांचे नेतृत्वाखाली बँकेने आर्थिक प्रगतीची उत्तुंग भरारी घेत साल सन २०१९-२० मध्ये (दिनांक ३१ मार्च २०२० अखेर) रुपये २९ कोटी पेक्षा अधिक नफा मिळविण्यात यश आले आहे.
 सध्या बँकेच्या महाराष्ट्रात २८ शाखा व कर्नाटक राज्यात २ शाखा अशा एकूण ३० शाखा कार्यरत आहेत. मुख्यालय उस्मानाबाद येथे ए.टी.एम. सुरु आहे. बँकेने कोअर बँकींग सोल्युशनचा अवलंब केला असून बँकने स्वतःच्या जागेत स्वतःचे डेटा सेंटर उस्मानाबाद येथे व डी.आर.साईट उदगीर येथे स्वतःच्या जागेत अद्यावत तंत्रज्ञानाने परिपुर्ण असे कार्यरत आहे.
सध्यस्थितीत बँकेकडे स्वमालकीच्या इमारती मुख्य कार्यालय- उस्मानाबाद, शिवाजी चौक लातूर, उदगीर, बार्शी, बीड, दत्तचौक सोलापूर, पंढरपूर, भुम, परंडा, चाटी गल्ली सोलापूर तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या शाखा- उमरगा, नळदुर्ग.करीता जागा/इमारत खरेदी केलेल्या आहेत. सध्या बँकेच्या १२ ठिकाणी स्वमालकीच्या इमारत जागा झाल्यामुळे त्याठिकाणी अत्याधुनिक सोलार सिस्टीमसह अद्यावत आहेत.
अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानामुळे बँकींग क्षेत्रात होत असलेले बदल स्विकारुन कोअर बँकिंग कार्यप्रणाली आमलांत आणलेली आहे. सदर तंत्रज्ञानाचा अचूक व पर्याप्त वापर करुन त्याचा उपयोग बँक व ग्राहकांना अपेक्षीत व गतिमान सेवा देत आहे. बँकेने ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला असून सेंट्रलाईजड क्लिअरिंग चेक्स, आरटीजीएस/एनईएफटी, एस.एम.एस. आदी अद्ययावत सुविधा सुरु केलेल्या असून, कोअर बँकींग प्रणालीमुळे ग्राहकांना जलद सेवा देण्यात बँक अग्रेसर आहे.
बँकेच्या संचालक मंडळाने एक पथदर्शी धोरण (व्हीजन) समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या व्यवसायात या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे आणि बँक एका महत्वपुर्ण टप्प्यावर पोहंचत आहोत. रिझर्व्ह बँकेच्या अर्थिकदृष्टया सक्षम व उत्तम संचलित बँकांसाठीचे रिझर्व्ह बँकांचे निकष पालन केलेले आहे. तसेच बँकेच्या सभासंदाना साल सन २०११-१२ पासून सातत्याने सरासरी ८.००% लाभांश वितरण देत आहोत. संचालक मंडळाने समाजहिताच्या महत्वपुर्ण उपक्रमांना अंतकरणाने   राष्ट्र सेवा दल द्वारा संचलित आपले घर नळदुर्ग येथील अनाथ व निराधार असलेल्या बालकांना त्यांचे संगोपन व शिक्षणासाठी बँकेतर्फे रुपये १ लाख अर्थसहाय्य दिलेले आहे तसेच  मराठी भाषेचा प्रसार व मराठी वाड:मय साहित्याची जपणकु करीता ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन  उस्मानाबाद झालेले आहे त्या करीता रुपये ७ लाख अर्थसहाय्य देण्यात आले आहे.  सध्या जगात व देशात- राज्यात उद्भवलेली कोरोना (COVID-१९) महामारी रोगाचा प्रतिबंध् व नियंत्रण यासाठी  महाराष्ट्र शासन  मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता रुपये २५ लाख व गरीबांना जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा करण्यासाठी रुपये  ५ लाखचे (१००० किटस) वाटप करण्यासाठी .जिल्हाधिकारी, यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे
थकीत कर्जदारांनी बँकेच्या वसुली कार्यवाहीचा कटु अनुभव टाळण्यासाठी वेळेत कर्ज परतफेड करावी व बँकेच्या प्रगतीत हातभार लावणेबाबत अध्यक्ष बी. एस. मोदाणी यांनी आवाहन केलेले आहे. बँकेच्या या वाटचालीत बँकेचे अध्यक्ष श्री.बी.एस.मोदाणी, उपाध्यक्ष श्री.व्ही.जी.शिंदे, जेष्ठ संचालक श्री.व्ही.जे.शिंदे, इतर सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी शोभा एम. वारद व सरव्यवस्थापक श्री.एम.बी.गायकवाड, आणि सर्व कर्मचारी यांचे बँकेचे प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे. 
 
Top