उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोरोना आजारामुळे कर्नाटक राज्यातून सोलापूर जिल्ह्यात येऊन अडकलेल्या मेंढपाळ कुटुंबियांना महाएनजीओ फेडरेशन व अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी ता तुळजापूर या संस्थेच्या वतीने धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या मेंढपाळ कुटुंबियांना गेल्या आठ दिवसांपासून कोणत्याही गावात येण्यास मज्जाव करण्यात आले होते. तुम्ही वारंवार या गावातुन त्या गावात फिरत असता तुम्हाला कोरोना आजार असु शकतो. त्यामुळे तुम्ही आमच्या गावात थांबायचे नाही.अशी प्रश्ने ग्रामस्थ विचारत व गावात येऊ देत नाही. या मेंढपाळ कुटुंबियांना गेल्या आठ दिवसांपासून काहीही खाण्यास मिळाले नाही. ही गोष्ट यशवंतसेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश काळे यांना समजताच त्यांनी तात्काळ अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान यांना संपर्क करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली अन तात्काळ राम जवान यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.व सर्व साहित्य दुसर्‍याच दिवशी धान्य  किराणा साहित्य,साखर,रवा,गुळ,पँरेशट तेल, साबण,निरमा हे साहित्य वाटप करण्यासांठी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. यावेळी मेंढपाळ बांधवांनी मदत केल्याबद्दल महा एनजीओ फेडरेशन व अजिंक्य संस्थेचे आभार मानले व केलेल्या सहकार्यबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात व देशात संचारबंदी लागू असल्याने व जिल्हाबंदीचे आदेश असल्याने संस्थेचे सचिव राम जवान यांना उस्मानाबाद जिल्ह्यातुन सोलापूर जाण्यास अडचण असल्याने त्यांनी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांच्या माध्यमातून ही मदत मेंढपाळ कुटुंबियांना पोहचविण्यात आली आहे. यावेळी राम जवान यांनी यशवंतसेनेचे  प्रदेश अध्यक्ष उमेश काळे व सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांचे आभार मानले.

 
Top