उस्मानाबाद / प्रतिनिधी-
एकाद्या व्यक्तीचे काम होत नसेल अथवा ग्रामपंचायत मध्ये व अन्य ठिकाणी भ्रष्ट्राचार झाला असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्यप्रकारे तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. असे झाले तरच संबंधित भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा होऊ शकेल, असे केल्यानंतर आपल्याला योग्य तो न्याय मिळतो, असे  मत  माहिती अधिकार  कार्यकर्ता बाळासाहेब  सुभेदार  यांनी  व्यक्त केले.
बेंबळी येथे दक्षता समितीच्या वतीने गरजूवंताना जीवनावश्यक साम्रगी वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सुभेदार यांना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलाविण्यात आले होते. जीवनावश्यक साम्रगी वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातीलच श्रीराम नगर येथील डाॅॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरामध्ये शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ता तथा बेंबळी ग्रामपंचायतचे सदस्य शाम पाटील यांच्या वतीने चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभेदार यांनी दक्षता समितीच्या सदस्यांना जवळपास एक तास मार्गदर्शन करून श्ंकाचे निरसन केले.
पुढे बोलताना सुभेदार यांनी सांगितले की, एखाद्या विषया संदर्भात तक्रार करताना पहिल्यांदा आपण आपल्या मनातील भीती संपवली पाहिजे. संविधानाने देशातील नागरिकांना मोठे अधिकार दिले आहेत. त्याचा उपयोग प्रत्येक नागरिकांनी करने आवश्यक आहे. गावा-गावात संविधानाचे पारायण भरवणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सेवक आहेत, त्यांना साहेब म्हणणे चुकीचे आहे. माहिती अधिकाराचा वापर करने सहज आणि सोपे आहे. नागरिकांना आपल्या अधिकारांची योग्य माहिती नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास होतो. संविधानाने ग्रामसभेला मोठे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी मोठया संख्येने ग्रामसभेला उपस्थित रहाने गरजेचे आहे तरच गावात विकासात्मक कार्य होऊ शकतात असे सांगून त्यांनी जिल्हयातील प्रगत गावाचे उदाहरण देऊन विस्तारपुर्ण माहिती दिली. आपल्याला कोणत्या ही प्रकारची समस्या असल्यास माझ्याशी संपर्क करा, मी आपल्या योग्य ती मदत करतो, असे आश्वासन ही सुभेदार यांनी दिले.  त्यानंतर शाम पाटील व नंदकुमार मनाळे यांनी आलेल्या तक्रारी संदर्भात कटू अनुभव त्यांना सांगितले. यावेळी सुभेदार यांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्याचे समधान केले.
यावेळी दक्षता समिती चे  गालिबखान पठाण, सुनिल वेदपाठक, अमर कटके, शितलकुमार शिंदे, गोविंद पाटील, आमोल गाडे,  श्रीकृष्ण खापरे पाटील, नितीन खापरे, इरफान जमादार, नंदकुमार मानाळे, शाम पाटील, रणजीत बर्डे, सचिन व्हनसनाळे, दिनेश हेड्डा, बालाजी माने,संतोष आगलावे, विद्याताई माने,  अतीक सय्यद, गुड्डू सोनटक्के, सिध्दनाथ रेडेकर यांच्यासोबत अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोत पालन करण्यात आले.

 
Top