
तालुक्यातील भातंब्री येथे एक खोंड मयत अवस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवार दि. 24 रोजी सकाळी उघडकीस आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, भातंब्री (ता.तुळजापूर) येथील अरुण दत्तु दांगट याचे यांचा शेतातील गट नंबर 22 मध्ये खोड अज्ञात कारणाने मयत झाले होते. ही घटना सकाळी उघडकीस येताच मंगरुळ येथील पशु वैद्यकीय डाँक्टर के. ऐ. खाडे व तलाठी व्ही. पी. डावरे यांनी घटना स्थळी भेट देवुन पंचनामा केला आहे.सदरील खोंडाचा रक्ताचे नमुने तपासणी नेण्यात आले असुन तपासणी अंती हे खोंड कशाने मयत झाले हे स्पष्ट होणार आहे. खोंड अज्ञात कारणाने मृत पावल्याने पशु चालक शेतकऱ्याचे ३५ हजाराच्या आसपास नुकसान झाले आहे. सदरील खोंडास राञी सर्पदंश झाल्याने मयत झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.