तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्याचे आमदार तथा माजीमंञी राणाजगजितसिंह  पाटील यांनी तुळजापूर शहरास भेट देवुन कोरोना  पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाँकडाऊन मधील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतमर  त्यांच्या वतीने चालु असलेल्या अन्नदान  उपक्रमस्थळी भेट देवुन पाहणी केली.
प्रारंभी आमदर राणाजगजितसिंह यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी तहसिलदार सौदागर तांदळे,  नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  विनोद गंगणे, आनंद कंदले सह शहरात विविध ठिकाणी जावुन  व्यवास्थेचा आढावा घेवुन ग्रामस्थांशी, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा केली व संपुर्ण माहीती घेतली कुठे काही लागल्यास मला बिनधास्तपणे सांगा अशा सुचना केल्या . नंतर  त्यांचाच संकल्पनेतून  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील गोरगरीब तसेच ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपासमारीस सामोरे जावु लागू नये म्हण्न बुधवार दि. 1 पासुन विश्वनाथ काँर्नर हाँटेल येथे अन्नदान उपक्रम सुरु केला आहे  येथील पाहणी करुन   हा उपक्रम लाँकडाऊन संपेपर्यत चालुच ठेवा असे सांगितले . यावेळी नगरपरिषदचे नगरसेवक, भाजपा कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
 
Top