वाशी /प्रतिनिधी-
लॉक डाऊन मध्ये कोरोना साथीने उपासमारीला सामोरे जात असलेल्या गरजू –गरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे करत तेरखेडा येथील फटाका व्यवसायकानी दिनांक ०८ रोजी ६०० कीट वाशीचे तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांच्याकडे सपुर्द केले.
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत.लॉकडाऊन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे .तहसीलदार वाशी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत तेरखेडा येथील फटाका कारखानदारांनी ६०० कीट ची मदत केली .सदर कीट मध्ये गोडेतेल,तांदूळ,तुरडाळ ,मीठ ,साखर ,गव्हाचे पीठ ,साबण इत्यादी साहित्यांचा समावेश आहे .
यावेळी मंजूर ,पठाण,तय्यब दारुवाले,कलाम पठाण,जमीलभाई दारुवाले,पापा दारुवाले ,शकीलभाई दारुवाले,नम्मूसाहेब दारुवाले हजर होते.