तुळजापूर /प्रतिनिधी-
कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर पोलिसांनी तुळजापूर शहरात पथसंचलन करुन विनाकारण घराबाहेर फिरु नका घरातच राहा कोरोना टाळा,असे  आवाहन केले.
पोलिस स्टेशन मधुन सुरु झालेले हे पोलिसांचे पथसंचलन बसस्थानक,  छञपती शिवाजी महाराज पुतळा,   भवानी रोड मंदीर रोड शुक्रवार पेठ, पावणारा गणपती,  सांळुके गल्ली, आर्य चौक , कमानवेस , मंगळवार पेठ मार्ग पोलिस स्टेशन येथे याचा सांगता झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे, पो.नी हर्षवर्धन गवळी, सपोनी दांडे , झिंजुर्ड रोटेसह  सुमारे शंभर पुरुष -स्ञी कर्मचारी यात सहभागी झाले होते.

 
Top