लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात लाँक डाऊन मुळे प्रत्येकानी कुटुंबासह घरात बसुनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक डॉ. दापके- देशमुख दिग्गज यांनी संस्थेच्या वतीने या वर्षीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नव्हे तर पुस्तके वाचून’ साजरी करण्यात यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने केले होते कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ वाचाल तर वाचाल’ असा संदेश दिला आहे. वाचनामुळे दिशाहीन झालेला समाज एकत्रित येवू शकतो इतकी क्षमता वाचनामध्ये आहे.असा विचार मांडला होता.त्यामुळे याचे  अनुकरण करत स्वतः पुस्तक वाचून त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले.
 
Top