उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
लाॅकडाऊन जाहीर होऊन २२ ते २३ दिवस झाले आहेत. लाॅकडाऊन मध्ये स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास ड्युटी बजावून पोलीस अधिकारी व कर्मचारी  तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत .
अशा पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मनसेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या माध्यमातून पाणी बाॅटल,बिस्किटे वितरीत करून सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. 
 
Top