तुळजापूर/प्रतिनिधी -
तालुक्यातील गंधोरा येथील ग्रामस्थांचा रेशन दुकानदार विरोधात असलेल्या तक्रारी चा पार्श्वभूमीवर मंडल अधिकारी व तलाठी यांनी बुधवारा दि 15रोजी गंधोरा येथे जावुन जबाब घेवुन पंचनामा करुन  रेशन दुकान सील केले.
गंधोरा ता तुळजापूर येथील रेशन दुकानदार शेख  यांचा विरोधात युनिट प्रमाणे माल न देता कमी देणे पावत्या न देणे फलक न लावणे विचारणा केली असता अरेरावी ची भाषा करणे अशा असंख्य तक्रारी आल्याने या बाबतीत शहानिशा करण्यासाठी तहसिलदार यांनी  मंडल अधिकारी शिंदे व तलाठी शेकदार यांना पाठवले व गावातील सरपंच पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष समोर चौसष्ट जणाचे जबाब घेवुन पंचनामा करुन रेशन दुकान सील करण्यात आले. पंचनामा व जबाब यांच्या सविस्तर अहवाल तहसिलदार यांच्या कडे सादर केला जाणार  असुन या बाबतीत निर्णय होणार आहे.

 
Top