उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 लॉकडाउन व संचारबंदीच्या आदेशानंतरही काही उपद्रवी लोक जाणीवपूर्वक, खोटी कारणे देऊन रस्त्याने वाहन घेऊन फिरत आहेत. त्यांना पायबंद व्हावा, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाने वाहने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्हाभरात पोलिस ठाण्यांतर्गत २१४ वाहने जप्त करण्यात आली.
 
Top