उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी फेसबुकवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिध्द करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कौडगाव (ता.उस्मानाबाद) येथील एका तरुणावर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी बाबासाहेब ढेकणे,असे या तरुणाचे नाव असून, त्याने ४ ते ७ एप्रिल या कालावधीत त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन समाजात धार्मीक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज विघातक मजकूर टाकला. तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) प्रसिध्द केला. त्याने सामाजिक एकता व सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम-१५३ (अ) (१) (अ), ५०५(२) अन्वये गुरूवारी गुन्हा नोंदवण्यात आला अाहे.
 
Top