तुळजापूर / प्रतिनिधी-
 शहरातील युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांच्याकडून तहसीलदारांकडे नऊ क्विंटल गहू, तांदूळ व मीठ आदी साहित्य तहसीलदारांकडे सोपविण्यात आले. कोरोनाच्या संकटात शासनामार्फत गोरगरिबांना या साहित्याचा पुरवठा होणार आहे. लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमार ओढवली आहे. अशा कुटुंबांना शासनाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहेत. यासाठी उद्योजक दिनेश अग्रवाल यांच्या वतीने मंगळवारी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे ९ क्विंटल धान्य सोपविण्यात आले. यावेळी अग्रवाल यांच्यासह मुकुंद शिंदे, आबासाहेब पवार, कुलदीप पवार, विश्वास नाईगावकर, तहसीलचे कर्मचारी बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.
 
Top