
सध्या लॉकडाऊनमुळे एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या अनेक कामगारांवर काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यांची ही अडचण लक्षात घेऊन तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटील यांच्याशी संपर्क साधून नगर पालिके चे गटनेता युवराज नळे यांनी माहिती दिली. त्यानंतर त्यांना अामदार राणा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सूचना केल्या.
अामदार राणा पाटील यांच्या सुचनेनुसार उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी व उस्मानाबाद नगरपालिकेचे गटनेते युवराज बप्पा नळे यांच्या हस्ते अशा 25 गरजू कामगार कुटुंबाला अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी लघुउद्योग भारतीचे संतोष शेटे, प्रवीण काळे, संजय देशमाने,सुनिल गर्जे हे उपस्थित होते. याप्रसंगी लघुउद्योग भारतीच्या वतीने २१० किट प्रशासनाला दिल्याची माहिती शंभूदेव खटिंग व गाडे साहेब,सचीन लोंढे यांनी दिली.