उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोना वायरस मुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. उस्मानाबाद मध्ये िबहार, प.पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातील ६० विद्यार्थी अडकून पडले आहेत .  गेले कांही दिवस कांही लोकांनी मदत केली, परंतु लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढल्यामुळे मदतीचा आणखीन गरज निर्माण झाली आहे, अशा संकटसमय रूपामाता उद्योग परिवाराने विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय करून अनमोल कार्य केले आहे, असे मत मौ. महमंद जाफर अली खान यांनी व्यक्त केले .
उस्मानाबाद मध्ये गाजी मैदानात दारूल उलम शमसीया ही शाळा रज्जाक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविली जाते . या शाळेत चार राज्यातील ६० अनाथ विद्यार्थी असून यांना धार्मिक शिक्षणाबरोबर नियमितचे शिक्षण उर्दू, मराठी,  इंग्रजीमध्ये देण्यात येते. लॉकडाऊनमुळे या शाळेतील विद्यार्थी आडकून पडलेले असून त्यांच्या भोजनाची कोणतीही सोय नसल्यामुळे येथे भोजनाची सोय उपलब्ध करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. जिल्हा प्रशासनाने रूपामाता उद्योग समूहाला त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यास सांगितले. उद्योग समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी तातडीने दखल घेवून भोजनाची सोय केली.
यावेळी राजाभाऊ वैद्य, अॅड. अजित गुंड, मिलिंद खांडेकर आदींची उपस्थिती होती.

 
Top