लोहारा/प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील दुधी येथे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, विधान परिषद मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकूर  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा (प्रमोद दादा युवा मंच) दुधी गावामध्ये भाजपा नेते प्रमोद दादा लिमकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील 12 महीला बचत गटातील महिलांना, गावातील प्रौढ व्यक्ती, लह्रान मुलांना (वाॅशेबल) मास्क वाटप करण्यात आले.
नागरिकामध्ये कोरोना रोगांविषयी जनजागृती करण्यात आली. आपल्या मदतीसाठी व सेवेसाठी भाजपा (आम्ही)सदैव तत्पर आहोत. प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करा. काळजी घ्या ! घरी थांबा ! व पोलीसांना व प्रशासनाला मदत करा. तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी  सहभाग घेऊन विशेष सहकार्य केले. यावेळी उपस्थित शाखाध्यक्ष मोहन चौधरी, युवा मोर्चा शाखाध्यक्ष अतूल जाधव,अंगणवाडी सेविका, आशाताई, अरूण जाधव, श्रीकांत लिमकर, मूरलीधर लिमकर, प्रभाकर लिमकर, सुरज लिमकर, भिमा जाधव,शिवाजी जाधव, शिवाजी पाटिल,  जाधव श्यामराव, शहाजी जाधव, शुभम पाटिल, रोहित पाटिल,तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन विशेष सहकार्य केले.

 
Top